OUT CAMPAIGN – Declaration Translated Into MARATHI
Translation by Milesh Dongre
नास्तिक समुदायाने सदैव ,वास्तविक विचार आणि प्रबोधन मशाल धारकांच्या आघाडीत एक ऐतिहासिक भूमिका निभिवली आहे. आणि आता आपण सुद्धा out आंदोलनाच्या जरिये हे आदर्श जगाच्या समोर प्रस्तुत करू शकता.

नास्तिकांची असल संख्या बरेच मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घ्या, आणि सापड्यातून बाहेर पडा, मोकळे व्हा. स्वछंद्तेचा अनुभव करा आणि इतरांना सुद्धा बाहेर पडायला प्रेरित करा. (कुणाकरून धास्तीने नास्तिकतेचा स्विकार करून घेऊ नका , अपितु ते स्वतः त्यांच्या मर्जीने वास्तविकता पत्करतील , याची वाट पाहा.)

out आंदोलन , सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तिला, “ते एकटे नाहीत “, याचा आश्वासन देतो. हे आंदोलन, नास्तिक विषयावर चर्चा सुरु करण्याची संधी देतो, ज्यामुळे नास्तिकांची केली जाणारी गैरसमज आणि त्यांच्यावर लादले जाणारे चुकीच्या आरोपांना, लढा मिळतो. चला जगाला हि घोषणा करून देऊ , कि आम्हाला टाळणे अशक्य आहे आणि आम्हाला धिक्कारणारे आमचे निंदक सदैव आम्हाला बहिष्कृत करू शकत नाही.

ज्या प्रमाणे out आंदोलनात सह्भाग्यांची संख्या वाढत जाईल , त्याप्रमाणे धर्माधीकारांना भिणार्यांची संख्या कमी होईल. या, आपण जगाला समजवू, नास्तिकांमध्ये रंग-रूपांची, व्याक्तित्वांची विविधधता आहे आणि ह्यात तऱ्हा-तर्हांचे लोक सहभागी आहेत. आमच्यात कामगार आहेत आणि कर्मचारी पण. आमच्यात आई-वडील आहेत, मुले-मुली आहेत, आजी-आजोबा आहेत. आम्ही माणूस आहोत ( अर्थात आम्ही वानरांच्या कुटुबांचे अंश आहोत). आम्ही खरे मित्र आहोत आणि खरे नागरिक आहोत. आम्ही खरे माणस आहोत आणि आम्हाला कोणत्याही “चमत्कारावर” विश्वाश करायची गरज नाही.

राजनीती आणि शिक्षा क्षेत्रात झिरपणाऱ्या धर्माला तोंड द्यायचा वेळ आला आहे. फक्त नास्तिकच नव्हे, तर मोठी जनता सुद्धा, धमकीच्या ताकदीवर त्यांच्या मुलांवर आणि सरकारावर धर्माच्या कायदा अमल करण्यारा लोकांपासून त्रासली आहे. नैतिक आणि सार्वजनिक बाबतीत, “चमत्कार’,या शब्दाचा उपयोग आम्हाला मान्य नाही.

आंदोलनात बरेच रुचकर कार्यक्रमांची तैयारी सुरु आहे, आणि म्हणून आपण जरूर सतत आमच्या संपर्कात रहा.
Out आंदोलनान्च्या ,”लोहित आकार” चिन्हाचे t-shirt , pin , button ,आणि stickers उपलब्ध आहेत.